Corona Update : देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या 45 हजारांच्या खाली
Updated On:

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 43 हजार 393 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या आता 3 कोटी 7 लाख 52 हजार 950 इतकी झाली आहे.
तथापि देशातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात घटत असून गेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसार देशातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या आता 4 लाख 5 हजार 939 इतकी झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा 97.19 असा जवळपास स्थिर राहिला आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.42 टक्के इतका झाला असून तो गेली 18 दिवस सतत तीन टक्क्यांच्या खाली राहिला आहे. दरम्यान, देशातील 36 कोटी 89 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.





