Corona : बारामती शहरात आणखी दोन रुग्ण
Updated On:

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरात आणखी दोन रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. बारामतीतील एकूण रुग्णांची संख्या 111 एवढी झाली आहे.
दि 24 रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील देसाई इस्टेटमधील रुग्णाच्या संपर्कातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे.
लॉक डाऊन झाले असून नागरिकांनी विनाकारण गर्दी टाळावी. तसेच अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





