पुणे – सोनाली संतोष लांडगे यांच्या प्रयत्नातून पुणे मनपा च्या मार्फत प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कोरोना प्रतिबंधक विशेष लसीकरण मोहीम दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी सर्वे नंबर १०२, अंगणवाडी क्र.५२, वैदुवाडी, चतुःशृंगी, पुणे ४११००१६ येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वस्तीतील २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पवार, योगेशजी बाचल भाजपा पुणेशहर उपाध्यक्ष, कालिका माता मंदिर अध्यक्ष गोविंद पवार, हमजी जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, सोनाली जाधव, संगीता पवार, ज्ञानेश्वर धनगर (PSI), संभाजी शिंदे, सुनील कांबळे आरोग्य निरीक्षक पुणे मनपा,
व स्थानिक नागरिक उपस्थित होते. सोनाली जाधव यांनी आशा नगर-वैदूवडी या वस्तीतील नागरिकांचा सर्व्हे केला. अनेक नागरिक लसीकरणा पासुन वंचित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सोनाली लांडगे नगरसेविका यांच्याकडे पाठपुरावा करून आज 210 नागरिकांचे लसीकरण करून घेतले.