बेल्हे -गुंजाळवाडी (ता. जुन्नर) या गावात करोनाचा शिरकाव झाला आहे. राजुरी येथील पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 50 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 5 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 4 निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेल्हेत किराणा व्यावसायिकाच्या दुकानातील संपर्कात आलेल्या 3 कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 1 अहवाल प्रतीक्षेत असून 2 निगेटिव्ह आले आहेत. गुळुंचवाडी येथील बाधिताच्या संपर्कातील 6 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. एस. बी. थोरात यांनी दिली.