करोना इफ्फेक्ट : लॉकडाऊनमुळे गंगा नदीच्या गुणवत्तेत सुधारणा
Updated On:

नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे आतापर्यंत देशभरात ५६ जणांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा चांगला परिणाम म्हणजे प्रदूषण सर्वात कमी झाले आहे. याचप्रमाणे गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी)नुसार, गंगा नदीच्या जवळपास २७ बिंदूवर पाण्याची गुणवत्ता सुधारली असून वन्यजीव आणि माशांसाठी योग्य झाले आहेत. याआधी उत्तरप्रदेशमध्ये प्रवेश करणाऱ्या काही स्थानांना वगळून बंगाल खाडीमध्ये जाण्यापर्यंत गंगा नदीची गुणवत्ता खराब होती.
तज्ज्ञांनुसार, आसपासच्या औद्योगिक कंपन्या बंद असल्याने गंगा नदीच्या पाण्याच्या गुणवत्ता सुधारली आहे. यासोबतच हिंडन आणि यमुना नदीच्या पाण्याचा गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे.




