आधीच कोरोना त्यात डेंगूची भर ; या जिल्ह्यात आढळले हजार पेक्षा जास्त रुग्ण
Updated On:

अमरावती : राज्यातील कोरोनाची परिस्थिती अदयाप सुधारलेली नाही. अशातच अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, थंडीतापाची लाट पसरली आहे.
त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकाच बेडवर दोघांवर उपचार करण्याची वेळ वैद्यकीय कर्मचारी यांचावर आली आहे.सामान्य रुग्णालयातील सर्वच वॉर्डमध्ये रुग्णांची गर्दी झाली असून वॉर्ड क्रमांक पाच तसेच अतिदक्षता विभागात डेंग्यू, मलेरिया, हिवताप रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचा कहर केला असून जिल्ह्यात आतापर्यंत 2067 संशयित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 268 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिली.





