घणसोलीच्या शाळेतील 16 विद्यार्थ्यांना करोना
Updated On:

ठाणे – नव्या मुंबईतील घणसोली येथील एका शाळेच्या 16 विद्यार्थ्यांना करोना झाल्याचे निदर्शनाला आले आहे. त्यामुळे त्या शाळेतील अन्य मुलांचे पालकही धास्तावले आहेत. ही मुले 8 वी ते 11 वी च्या वर्गातील आहेत.
या मुलांपैकी एका मुलाचे वडील 9 डिसेंबर रोजी कतारहून आले. ते आपल्या कुटुंबांसह घणसोली येथे राहात होते. तथापि ते कोविडचाचणीत निगेटीव्ह आली होते. पण त्यांच्या कुटुंबीयांचा चाचणी घेतली गेली त्यात त्यांचा अकरावीत शिकणारा मुलगा कोविड पॉझिटीव्ह आला होता.
त्यामुळे त्या शाळेतील अन्य विद्यार्थ्यांचीही चाचणी घेतली त्यात 16 जण पॉझिटीव्ह आढळले. गेल्या तीन दिवसांत या शाळेतील 811 मुलांची चाचणी घेतली गेली असून आज शनिवारी अन्य 600 मुलांची चाचणी घेतली जात आहे.





