AUS vs SA : कॉर्बिन बॉशला ‘ती’ चूक पडली महागात, आयसीसीने केली कठोर कारवाई

बॉशने बेन ड्वार्शुइसला डगआउटकडे जाण्याचा केला इशारा –
या सामन्यातील 17व्या षटकात कॉर्बिन बॉशने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बेन ड्वार्शुइसला बोल्ड केल्यानंतर त्याला डगआउटकडे जाण्याचा इशारा केला. ही कृती आयसीसीच्या नियमांविरुद्ध असल्याने बॉशला दोषी ठरवण्यात आले. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 नुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याचा अपमान करणे किंवा त्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करणे नियमांचे उल्लंघन आहे.
गोलंदाजीत बॉशची कमाल –
South Africa’s all-rounder has been sanctioned for an on-field incident during the second #AUSvSA T20I.
Details 👇 https://t.co/9X6yrLGARQ
— ICC (@ICC) August 13, 2025
कॉर्बिन बॉशने सामन्यानंतर आपली चूक मान्य केली. हा त्यांचा पहिलाच नियमभंग आहे. या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बॉशने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत विशेष कामगिरी केली नाही, परंतु गोलंदाजीत त्याने 3 षटकांत केवळ 20 धावा देत बेन ड्वार्शुइस, मिशेल मार्श आणि अॅडम झॅम्पा यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
मालिकेतील अंतिम सामना 16 ऑगस्टला होणार –
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना 16 ऑगस्ट रोजी केर्न्स येथील कॅजलीज स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील.





