कॉपीराइट प्रकरण: धनुषने पाठवली 10 कोटींची नोटीस; नयनताराने दिलं सणसणीत उत्तर, अभिनेत्री म्हणाली…

Dhanush | Nayanthara : बादशाह आणि कपिल शर्मानंतर आता दोन दाक्षिणात्य स्टार्समध्ये कायदेशीर नोटीसचे युद्ध सुरू झाले आहे. हे दोन्ही स्टार्स साऊथचे मोठे चेहरे आहेत. ‘नयनतारा आणि धनुष’. नयनताराचा ‘नयनथारा: बियॉन्ड द फेयरीटेल’ ही डॉक्युमेंटरी नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
या डॉक्युमेंटरीमध्ये धनुषचे ‘नानुम राउडी धन’ हे गाणे 3 सेकंद वापरले गेले आहे. या गाण्याचा निर्माता धनुष आहे. हे गाणे वापरल्याबद्दल धनुषने अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यावर नयनताराने आपला संताप व्यक्त करत धनुषवर टीका करणारे वक्तव्य जारी केले आहे.
धुनाशने 10 कोटी मागितले..
धनुषने नयनताराला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यानंतर नयनतारा संतापली आणि तिने धनुषचा पर्दाफाश केला. नयनताराने सोशल मीडियावर अनेक पेजेसचे स्टेटमेंट जारी केले आहे. ज्यात तिने अभिनेत्याला चोख प्रत्युत्तर दिले.
रजनीकांत यांच्याशिवाय अनेक दिग्दर्शकांनी या प्रकरणी नयनताराला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्रीने लिहिले, ‘तुमच्या एनओसीसाठी 2 वर्षे संघर्ष केल्यानंतर आणि आमच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीच्या रिलीजसाठी तुमच्या मंजुरीची वाट पाहिल्यानंतर, आम्ही सध्याच्या आवृत्तीचे संपादन केले आणि त्याग केला.
View this post on Instagram
कारण अनेक विनंत्या करूनही तुम्ही नानम राऊडी धानची गाणी किंवा सीन कट किंवा फोटो वापरण्याची परवानगी नाकारली होती. माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये चित्रित केलेली दृश्ये फोनवर चित्रित करण्यात आली असून याला तुमचा काही आक्षेप नसावा. असं अभिनेत्री म्हणाली आहे.
‘ही तुझी आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. जे तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल खूप काही सांगून जाते. तुम्ही दिलेल्या ज्ञानाचे तुम्ही पालन करत नाही. किमान माझ्या आणि माझ्या जोडीदारासाठी नाही.
मला तुमची कायदेशीर नोटीस मिळाली आहे. यावर कायदेशीर मार्गाने योग्य उत्तर देऊ. धनुषने नयनताराच्या या उत्तरावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, नयनताराचा डॉक्युमेंट्री 18 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.





