Copa America 2024 (ECU vsVEN) : व्हेनेझुएलाची दमदार विजयी सलामी, इक्वेडोरचा केला पराभव…

Copa America 2024 (Ecuador vs Venezuela) : – उत्तरार्धात जॉण्डर कॅडिज आणि एडुआर्ड बेलो यांनी दहा मिनिटांच्या अंतराने केलेल्या दोन गोलच्या जोरावर व्हेनेझुएलाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली. व्हेनेझुएलाने इक्वेडोरला 2-1 असा पराभवाचा धक्का दिला.
इक्वेडोरला हा सामना 10 खेळाडूंसहच खेळावा लागला. कर्णधार एनर व्हॅलेन्सियाला 22व्या मिनिटाला पंचांनी लाल कार्ड दाखवून बाहेर काढले. मात्र, त्यानंतरही जेरेमी सारमिएंटोने गोल करून विश्रांतीला इक्वेडोरला आघाडीवर ठेवले होते.
Heroica remontada de Venezuela 👊 pic.twitter.com/4kG5VpTgpA
— CONMEBOL Copa América™️ (@CopaAmerica) June 23, 2024
उत्तरार्धातही इक्वेडोर आपली ताकद ओळखून खेळत होते. त्यांनी सामन्यावर नियंत्रण राखले होते. गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात येणारे अपयश आणि त्या मिळाल्यावर गोल करण्यात आलेले अपयश अशा कात्रीत सापडलेल्या व्हेनेझुएलाच्या प्रशिक्षकांनी झटपट दोन बदल केले. हे बदल व्हेनेझुएलाच्या पथ्यावर पडले.
UEFA Euro Cup 2024 : बेल्जियम पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर, रोमेनियाला केलं पराभूत…
दोन्ही राखीव खेळाडूंनी गोल करून व्हेनेझुएलाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. प्रथम 64 व्या मिनिटाला कॅडिजने पास आल्यावर क्षणाचीही उसंत न घेता 15 यार्डावरून चेंडूला गोलजाळीची दिशा देत व्हेनेझुएलाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 74 व्या मिनिटाला बेलोने गोल केला. यानंतर इक्वेडोर संघाला पुनरागमन करता आले नाही.





