Copa America 2024 : कॅनडाचा पराभव करत अर्जेंटिनाची अंतिम फेरीत धडक, मेस्सीनं केला कारकिर्दीतील 109 वा गोल…

Copa America 2024 : लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीतील 109 वा आंतरराष्ट्रीय गोल आणि सध्याच्या स्पर्धेतील पहिला गोल यांच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिनाने कॅनडाचा 2-0 असा पराभव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
अर्जेंटिनासाठी 22व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने पहिला गोल केला, तर मेस्सीने 51व्या मिनिटाला एन्झो फर्नांडिसचा शॉट गोलमध्ये पाठवून आघाडी दुप्पट केली. त्यावेळी मेस्सीसमोर गोलकीपर मॅक्सिम क्रेप्यू होता पण या स्टार फुटबॉलपटूसमोर त्याला गोल अडवण्यात यश मिळाले नाही.
ARGENTINA WINS AND ADVANCES TO THE FINAL 🇦🇷 pic.twitter.com/gpqtpwu0oO
— CONMEBOL Copa América™️ ENG (@copaamerica_ENG) July 10, 2024
मेस्सीने अर्जेंटिनासाठी शेवटच्या 25 सामन्यात 28 गोल केले आहेत. कोपा अमेरिकेत त्याने आतापर्यंत 14 गोल केले आहेत, जे रेकॉर्डपेक्षा तीन गोल कमी आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचे मेस्सीपेक्षा जास्त गोल आहेत; ज्याने आतापर्यंत 130 गोल केले आहेत. इराणच्या अल दाईने 1993 ते 2006 पर्यंत 108 किंवा 109 गोल केले आहेत. 2000 मध्ये इक्वेडोरविरुद्धच्या त्याच्या गोलबाबत वाद आहे कारण या सामन्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाबाबत मतभेद आहेत.
Euro Cup 2024 : एका तपानंतर स्पेन अंतिम फेरीत, उपांत्य फेरीत फ्रान्सवर केली मात….
अर्जेंटिनाने आपल्या स्वातंत्र्यदिनी हा विजय मिळवला आणि आपली अपराजित मोहीम 10 सामन्यांपर्यंत नेली. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटिनाचा संघ उरुग्वे किंवा कोलंबिया यांच्याशी सामना करताना विक्रमी 16वे कोपा जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.





