Copa America 2024 : मेस्सीच्या अर्जेंटिनाने रचला इतिहास, कोलंबियाला हरवून 16व्यांदा कोपा अमेरिकेच्या ट्रॉफीवर कोरले नाव…

Copa America Final 2024 (Argentina vs Colombia) : लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघांची थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याची विजयी घोडदौड चालूच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमध्ये अर्जेंटिनाचा दबदबा दिवसेंदिवस वाढत आहे. आता अर्जेंटिनाने रोमहर्षक अशा लढतीत कोलंबियाचा 1-0 असा पराभव करून विक्रमी 16व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
कोपा अमेरिकेतील अर्जेंटिनाचे हे 16 वे विजेतेपद ठरले. कोपा अमेरिकेतील अर्जेंटिनाचा हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी 2021 च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम फेरीत ब्राझीलचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. अर्जेंटिनाने यापूर्वी 2021 कोपा अमेरिका आणि 2022 चा विश्वचषक जिंकला होता.
2024 कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी, 15 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता फ्लोरिडा येथील हार्ड रॉक स्टेडियमवर खेळला गेला. सामना खूपच रोमांचक झाला कारण विजयी गोल फूट टाइममध्ये नाही तर अतिरिक्त वेळेत झाला. दोन्ही संघांमधला सामना अगदी चुरशीचा होता जिथे निर्धारित 90 मिनिटामध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर, स्टाॅपेज वेळेतही सामना गोलशून्य राहिला.
RESPETEN LOS RANGOS, EH pic.twitter.com/L5VjGlwRsn
— CONMEBOL Copa América™️ (@CopaAmerica) July 15, 2024
त्यानंतर बदली खेळाडू म्हणून आलेल्या लॉटारो मार्टिनेझने अतिरिक्त वेळेत गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली जी शेवटपर्यंत अबाधित राहिली. सामन्यातील एकमेव गोल 112 व्या मिनिटाला (अतिरिक्त वेळेत) झाला, जो अर्जेंटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने केला. हा त्याचा स्पर्धेतील पाचवा गोल होता, ज्यासाठी त्याला गोल्डन बूटचा किताबही देण्यात आला.
मेस्सी खेळू शकला नाही संपूर्ण सामना…
अंतिम सामन्यात दुखापतीमुळे मेस्सीला मैदान सोडावे लागले होते. यामुळे मेस्सी दु:खी झाला आणि बेंचवर बसून त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
Son lágrimas de líder, Leo 🫶 pic.twitter.com/5XUSSYUVXg
— CONMEBOL Copa América™️ (@CopaAmerica) July 15, 2024
सामन्याच्या 64व्या मिनिटाला मेस्सीला दुखापत झाली. प्रशिक्षकांनी काही काळ त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली, पण शेवटी या स्टार खेळाडूला पर्याय म्हणून मजबूत व्हावे लागले.या स्पर्धेत मेस्सी सतत पायाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता आणि त्याला अडचणींचा सामना करावा लागला. याच कारणामुळे तो अर्जेंटिनाच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यातूनही बाहेर पडला होता. असे असले तरी, मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला आणखी एक मोठे विजेतेपद मिळवण्यात यश आले आहे.
Euro Cup 2024 : स्पेनने रचला इतिहास, इंग्लंडला हरवून पटकावलं यूरो कपचं जेतेपद…
अर्जेंटिना ठरला स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ
उल्लेखनीय गोष्ट अशी की, 2024 मध्ये कोपा अमेरिका जिंकून अर्जेंटिना स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. यावेळी संघाने 16 वे विजेतेपद पटकावून उरुग्वेला मागे सोडले. या मोसमापूर्वी अर्जेंटिना आणि उरुग्वेने प्रत्येकी 15 जेतेपदे पटकावली होती. आता अर्जेंटिनाने 16 व्या जेतेपद पटकावत स्वतःला स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनवले आहे.





