NFCSF : ऊसतोड कामगारांची पिळवणूक नाही, साखर कारखान्यांच्या संघटनेकडून स्पष्टीकरण…

नवी दिल्ली – महाराष्ट्र किंवा गुजरातमध्ये ऊसतोड कामगारांची पिळवणूक होत नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय साखर कारखाना महासंघा( National Federation of Cooperative Sugar Factories) कडून करण्यात आले आहे. यासंदर्भात अमेरिकन वृत्त माध्यमात येत असलेल्या बातम्या कटकारस्थानाचा भाग आहे. यामुळे भारतातील साखर उद्योगाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत आहे असे महासंघाने म्हटले आहे.
महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, या चुकीच्या माहितीमुळे कोका कोला पेप्सीसारख्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्र आणि गुजरात मधून साखर नाकारण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही माहिती अयोग्य आहे असे आम्ही अमेरिकन वकिलात आणि पंतप्रधान कार्यालयाला कळविले आहे. या सदर्भात आम्ही चौकशी सुरू केली आहे.
महाराष्ट्र, गुजरातमध्ये अजूनही ऊसतोड कामगाराकडून केली जाते. यासाठी मुकादम नेमले जातात. हे मुकदम कामगारांची नियुक्ती करतात. या कामगारांची काळजी घेतली जाते. त्यांना अन्न, वस्त्र, निवार्याबरोबरच वेळेवर पेमेंट केले जाते. त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली जाते.
ऊस तोडीसाठी कामगारांची संख्या कमी करण्याचा साखर कारखान्याचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून हार्वेस्टरसाठी कर्ज घेण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात कामगारांची संख्या पंधरा लाखावरून साडेसात लाखावर आली आहे.
Delhi Cabinet Decisions | इलेक्ट्रीक वाहनांना सबसिडी आणि टॅक्समध्ये मिळणार सूट – मुख्यमंत्री आतिशी
या कामगारांना मदत व्हावी यासाठी केंद्र सरकार उसाच्या आधारभूत किमती वाढवीत असते. त्यामुळे अतिरिक्त पंधरा लाख टन इतकी साखर निर्यात केली जाते. ऊसतोड कामगारांना परिश्रम करावे लागतात. मात्र त्यांना आवश्यक इतका पगार दिला जातो. त्यांच्या बहुतांश गरजा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे त्यांची पिळवणूक केली जाते असे म्हणता येणार नाही असे साखर कारखान्यांच्या संघटनेने म्हटले आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन कमी होऊन 280 लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 319 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. 40 लाख टन साखर इथेनॉलसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.





