Cooch Behar Trophy 2024-25 (AP vs MAH) : किरणच्या शतकाने महाराष्ट्र सुस्थितीत….

अनंतपूर – किरण चोरमालेच्या दमदार शतकाच्या जोरावर कूचबिहार करंडक स्पर्धेत महाराष्ट्राने आंध्रविरुद्ध खेळताना पहिल्याच दिवशी ५ बाद २८४ धावांपर्यंत मजल मारली.
Stumps Day 1: Maharashtra – 284/5 in 89.6 overs (Aneesh Joshi 4 off 15, Sushrut Sawant 59 off 209) #APvMAH #CoochBehar #Elite-QF4
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 22, 2024
महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. महाराष्ट्राकडून नीरज जोशी व किरण चोरमाले यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी ३५ धावांची सलामी दिली. त्यानंतर नीरज जोशी २५ धावांचे योगदान देऊन परतला. त्यानंतर आलेल्या साहिल नलगे सोबत किरणने ४५ धावांची भागीदारी केली. मात्र यामध्ये साहिलचा वाटा केवळ १६ धावांचा होता.
साहिल बाद झाल्यानंतर किरण आणि सुश्रुत सावंत यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३१९ चेंडूत १९२ धावांची भागीदारी केली. दरम्यान किरणने आपले शतक १५० चेंडूत पूर्ण केले. सुश्रुतने देखील १४० चेंडूचा सामना करताना आपले अर्धशतक पूर्ण केले.
किरण १६२ धावांवर खेळत असताना युवानने बाद केले. किरण बाद झाल्यानंतर अनुराग कवाडे (६) व ओम भाबड (०) हे झटपट परतले. दिवसअखेर सुश्रुत सावंत ५९ धावांवर तर अनिश जोशी ४ धावा करून नाबाद राहिले. आंध्र संघाकडून युवानने २ तर पी. आदित्य रेड्डी, बी. यशवंत व एन. राजेश यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला.





