Bhagwant Mann : भगवंत मान यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वादंग; भाजपकडून टीकेची झोड

पंजाबमध्ये विधानसभेच्या एका जागेसाठी १९ जूनला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठीच्या प्रचारामुळे त्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पोटनिवडणुकीत भाजप ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली मतं मागत असल्याचा आरोप इतर पक्ष करत आहेत.
त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. उत्तरादाखल मान यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने सिंदूरचा (कुंकू) विनोद करून टाकला आहे.
भाजपचे नेते तुमच्या घरी सिंदूर घेऊन आल्यास तो लावणार का? एक राष्ट्र, एक पती अशी योजना सुरू झाली आहे का, असा उपरोधिक प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. त्यावरून भाजपच्या गोटातून मान यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला. मान यांचे वक्तव्य अनुचित आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले; त्यांच्या पत्नींचा मान यांनी अवमान केला. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. घरोघर सिंदूर पाठवण्याची आमची कुठलीही योजना नाही. मान यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.





