IAS Shailbala Martin | मध्य प्रदेश सरकारमधील चर्चित आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. शैलबाला मार्टिन यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर मंदिरातील लाऊडस्पीकरबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर वाद सुरु झाला आहे. हिंदू संघटनेने त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला असून. काँग्रेसने हा योग्य मुद्दा असल्याच म्हटले आहे. ‘मंदिरातील लाऊड स्पीकर्समुळे अनेक दूरवरच्या गल्लीबोळापर्यंत ध्वनी प्रदूषण होते,’ असे शैलबाला मार्टिन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हे स्पीकर्स मध्यरात्रीपर्यंत सुरु असतात. त्यामुळे कोणाला अडचण येत नाही, असे त्यांचे म्हणण आहे. दुसऱ्या पोस्टला रिपोस्ट करत त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना संस्कृती बचाव मंचने यावर नाराजी व्यक्त केली. एका युजरच्या कमेंटवर शैलबाला यांनी रिप्लाय सुद्धा केला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर एक आदेश काढलेला होता. त्यात सगळ्या धार्मिक स्थळावरुन लाऊडस्पीकर हटवण्याचा आणि डीजेवर बंदी घालण्याचा आदेश होता. या आदेशाची अंमलबजावणी केली, सर्व समुदायाच्या धार्मिक स्थळावरुन लाऊडस्पीकर्स हटवले, डीजे बंद झाले, तर सर्वांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. IAS Shailbala Martin | हिंदू संघाटनाकडून नाराजी व्यक्त कोणी हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का लावण्याच काम केले, तर संस्कृती बचाव मंच त्यांचा विरोध करेल, असे संस्कृति बचाव मंचचे अध्यक्ष पंडित चंद्रशेखर तिवारी म्हणाले. मंदिरात सुरेल आवाजात आरती आणि मंत्रोच्चारण होते. शैलबाला मार्टिन यांना माझा एक प्रश्न आहे, त्यांनी कधी मोहर्रमच्या मिरवणुकीवर दगडफेक होताना बघितली आहे का?. पण हिंदुंच्या मिरवणुकीवर दगडफेक होते. त्यामुळे मार्टिन मॅडम तुम्हाला हिंदू धर्माच्या भावनांना धक्का पोहोचवण्याचा काहीही अधिकार नाही, असे चंद्रशेखर तिवारी म्हणाले. IAS Shailbala Martin | कोण आहेत शैलबाला मार्टिन ? शैलबाला मार्टिन या 2009 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. मध्य प्रदेश राज्य सेवेत त्या अधिकारी होत्या. त्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी बनल्या. सध्या त्या वल्लभ भवन येथील सामान्य प्रशासन विभागात कार्यरत आहेत. IAS Shailbala Martin |