कंत्राटी कामगारांना सुधारित दराने वेतन द्यावे

मनसेची मागणी; महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना सुधारित दराने किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्ष रुपाली पाटील यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त सौरभ राव यांना नुकतेच दिले आहे.

महापालिकेत सुमारे आठ ते दहा हजार कंत्राटी कर्मचारी वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत. त्यांना महापालिकेकडून किमान वेतन दरानुसार वेतन दिले जात असले, तरी ते जुन्या दराने दिले जात आहे. त्याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकताच एक ठराव करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2018 पासून सुधारित दराने किमान वेतन देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, अद्याप पुणे महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसेच या कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे सदस्य तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here