Ramdas Athawale | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हिंसेचा मार्ग सोडून संविधानाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नक्षलवाद्यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. इतकेच काय तर त्यांना रिपब्लिकन पक्ष कडून निवडणूक लढवण्याची ऑफर देखील आठवले यांनी दिली आहे. गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून हिंसेचा मार्ग सोडला. मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांना भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. याबाबत विचारले असता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘नक्षलवाद्यांच्या त्यागाबाबत आम्हाला सहानुभूती आहे. अनेक उच्चशिक्षित लोक यात आले. परंतु, त्यांनी स्वीकारलेला हिंसेचा मार्ग मान्य नाही.” “नक्षलवाद्यांना आता हिंसेचा मार्ग योग्य नसल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे ज्या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले, त्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि ज्यांनी अजूनही हिंसेचा मार्ग सोडलेला नाही, त्यांनीही शस्त्र खाली ठेवून संविधानाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही मी यानिमित्ताने करतो,” असेही आठवले म्हणाले. Ramdas Athawale | ….तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल आठवले पुढे म्हणाले, “चुकीचा मार्ग निवडलेल्या व हाती शस्त्र घेतलेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेकजण उच्चशिक्षित आहेत. काही युवक सुद्धा आहेत. यापैकी ज्यांना राजकारणात येण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी रिपाइंची दारे खुली आहेत. रिपाइंचे अनेक गट असले तरी देशभरात केवळ आमचाच रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. दोन राज्यांत आमचे आमदार आहेत. आणखी दोन राज्यांत आमदार आले तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. पुढील वर्षी आमचा तसा प्रयत्न राहील. याचदृष्टीने पुढीलवर्षी ८ मार्च रोजी नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर रिपाइंचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Ramdas Athawale | दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या ५० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हेही वाचा: Healthy Diwali Snacks: फक्त 30 मिनिटांत तयार करा स्वादिष्ट दिवाळी पदार्थ: घरच्या घरी बनवा झटपट चिवडा, चकली आणि शेव!