Satara: नेले येथील भैरवनाथ मंदिराच्या उभारणीचे काम सुरु
Satara श्री भैरवनाथ मंदिर उभारणी कमिटी व ग्रामस्थांनी याबाबत सांगितले की, मंदिराच्या कामामध्ये सुशोभीकरण, परिसर विकास तसेच इतर आवश्यक बांधकामांचा समावेश असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या वैभवात भर पडणार आहे.

Satara: नेले येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या भव्य कामाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मंदिराचा परिसर अधिक आकर्षक व प्रशस्त करण्यासह भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कामासाठी अंदाजे १ कोटी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित असून दानशुरांसह भाविकांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री भैरवनाथ मंदिर उभारणी कमिटी व ग्रामस्थांनी याबाबत सांगितले की, मंदिराच्या कामामध्ये सुशोभीकरण, परिसर विकास तसेच इतर आवश्यक बांधकामांचा समावेश असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या वैभवात भर पडणार आहे. सातारा जिल्ह्यात एका वेळेस दोन हजार लोक बसण्याची क्षमता असणारे हे एकमेव मंदिर असणार आहे. या कामासाठी १ कोटी ४० लाखांचे अंदाजपत्रक असून मंदिर गाभारा, सभामंडप व मंदिराच्या प्रागंणासह एकूण बांधकाम क्षेत्र ४ हजार ४५० चौरस फूट आहे. ग्रामस्थ, भैरवनाथ भक्त आणि विविध मान्यवरांच्या सहकार्याने हे भव्य कार्य सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या वैभवात भर पडणार आहे.
मंदिराचे बांधकाम आर्किटेक्ट महेश कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावातीलच इंजि. अभिजित केसुगडे व इंजि. सुधीर जाधव करणार आहेत. सुभाष जाधव, सुनील जाधव, संदीप वाघमळे, बाळासाहेब सावंत, महादेव धोत्रे, अशोक जाधव, ॲड. सचिन जाधव, दत्तात्रय जाधव, सुनील चंद्रकांत जाधव, सुनील कुंभार, चंद्रकांत टिळेकर, आनंदा कांबळे, आनंदा जाधव, किसन जाधव, रमेश पिसाळ, राजेंद्र नलवडे, देवेंद्र डांगे, सुधाकर केसुगडे, रोहित जाधव, धनाजी जाधव, हेमंत काळंगे, महेंद्र टिळेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने या कामासाठी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमामुळे नेले परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मंदिराचे काम दर्जेदार व नियोजित पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री भैरवनाथाच्या कृपेने आणि सर्वांच्या सहकार्याने हे भव्य कार्य लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास श्री भैरवनाथ मंदिर उभारणी कमिटी व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.





