पुणे जिल्हा | पेठगावात आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात

सोरतापवाडी (वार्ताहर) – पेठ गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी मागणी बर्याच दिवसापासून ग्रामस्थांनी केली होती. पेठगावची वाढती लोकसंख्या व आरोग्य उपकेंद्राची गरज लक्षात घेता आदर्श सरपंच सूरज चौधरी यांनी त्यांच्या काळात आरोग्य उपकेंद्र मंजूर करून आणले व सरपंच जयश्रीताई चौधरी व माजी सरपंच तानाजी चौधरी यांच्या मागणीला यश आले व आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात झाली.
उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्याने महाराष्ट्र शासन उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ कार्यालय यांच्या 15 वा वित्त आयोगमधून 43,42,262 रुपयांचा निधी मंजूर झाला. आणि या उपकेंद्र इमारतीच्या कामास सुरुवात झाली. यावेळी सरपंच जयश्रीताई चौधरी यांनी सांगितले की ग्रामस्थ व महिलांना आरोग्यविषयक सेवा देऊन औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सध्या औषधोपचार घेण्यासाठी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. त्यामुळे गावातच उपकेंद्र होण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची मागणी पुर्ण होत असुन बांधकामाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी लक्ष देण्यात येणार असल्याचे सरपंच जयश्रीताई चौधरी यांनी सांगितले.
यावेळी सरपंच जयश्रीताई चौधरी, उपसरपंच लक्ष्मीताई गायकवाड, माजी सरपंच तानाजी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य काळुराम चौधरी, ग्रामपंचायत सदस्या विजया चौधरी, आदर्श सरपंच महादेव चौधरी, रामदास चौधरी, चेअरमन सोमनाथ चौधरी, बाबुराव गायकवाड, राजेश चौधरी, राजेंद्र चौधरी, अतुल चौधरी, विठ्ठल मारणे, निलेश चौधरी प्रतिक चौधरी, साहेबराव गायकवाड, ठेकेदार मंगेश भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.





