Nagar | कृषी प्रदर्शनाच्या डोम उभारणीस खा.लंके यांच्या उपस्थितीत शुभांरभ

पारनेर, (प्रतिनिधी) – सर्वसामान्य शेतकरी बाधंव व कृषी उद्योजक यांचा समन्वय साधत खा.नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले याहीवर्षी कृषीगंगा राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे आयोजन दि.17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण रुग्णालयाशेजारी, पारनेर येथे करण्यात आलेले आहे .
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या डोम उभारणीचा शुभांरभ खासदार डॉ.नीलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये पारनेर येथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, हितचिंतक व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे डबल हिंदकेसरी सप्त चॅम्पीयन एक कोटी किमंतीची सोन्या-मोन्याची बैल जोडी आहे.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये राज्यातील विविध 150 नामांकित कंपनी सहभागी होणार असून, यामध्ये ठिबक सिंचन, सोलर, शेततळी कागद, सैद्रिय,जैविक,रासायनीक खते, बी – बियाणे, नर्सरी,
दूध काढणी यंत्रे, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, अवजारे, ट्रॅक्टर, मधुमक्षिका पालन यासह खास महिलांना घरबसल्या उद्योग निर्मितीसाठी मार्गदर्शन व लाईव्ह डेमो, खास खव्वयांकरिता कोल्हापूर,सांगली,
सातारा, कोंकण येथील खाऊगल्ली, कोल्हापूरचा तांबडा,पांढरा रस्सा, तसेच महिलांसाठी दि.19 ऑक्टोबरला सायं.6 वाजता खेळ पैठणीचा हा मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केलेला आहे .
गेले अनेक वर्षापासून या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील शहरी ग्रामीण व पठारी भागात शेती व्यवसायातील विविध नवीन तंत्रज्ञान व शेतीविषयक माहितीचा फायदा शेतकरी वर्गाला झाला आहे.
तसेच या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कृषी विषयक वस्तूंच्या स्टॉलच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची गती वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग झाल्याची माहिती नीलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर यांनी देत सर्व शेतकरी बांधव,
नवउद्योजक व महिलांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पी . जे . एम . इव्हेंट मॅनेजमेंट काष्टीचे संचालक बंडू पाचपुते व गणेश जठार यांनी केले आहे.





