Satara : वाईत होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन

वाई : दि. १३ ते १७ मार्च या कालावधीमध्ये वाईत कृषी प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले असून मंडपाचे भूमिपूजन कार्यक्रम जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीन पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
महागणपती घाटावरील वीर जीवा महाले उद्यान येथे भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू असून प्रदर्शनाची जय्यत तयारी आयोजकांच्यावतीने करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचा मंडप भूमिपूजन शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, किसनवीर कारखान्यांचे अध्यक्ष प्रमाेफ शिंदे, रमेश गायकवाड, भैय्यासाहेब डोंगरे, आनंद चिरगुटे, भूषण गायकवाड, राजेश शिंदे, लक्ष्मण गायकवाड, सुशांत गोळे, चरण गायकवाड, संपत महांगडे, आनंदा गोळे, संपत मानकुंबरे, महेंद्र पुजारी, अमृत गोळे, आपासाहेब दाणवले, प्रणित पिसाळ, प्रविण मतकर, मयुर चव्हान, किरण जाधव, केतन मराठे, बालकृष्ण तरडे, दिलीप वाडकर, सचिन पार्टे, अनिल पाटणे, सुनिल गोळे, सुधीर कदम, प्रशांत भिलारे, प्रकाश सूर्यवंश, दिपक भंगे, युगल घाडगे, राजू गायकवाड, मंगेश निकम, हर्षद वाडकर नंदकिशोर गायकवाड़, केदार काटे,प्रविण गोळे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी : खा. नितीन पाटील
अशा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन संकल्पना समजतात आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी अशी कृषी प्रदर्शने शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहेत. सुशांत गोळे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन यावेळी, खा. नितीन पाटील यांनी केले.





