सलग १३व्या दिवशी ग्राहकांना दिलासा; ‘हे’ आहेत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Updated On:

मुंबई – देशभरात सलग १३ दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झालेला नाही. ऑइल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत.
सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव ९१.१७ रुपये प्रति लिटर असून डिझेल ८१.४७ रुपये लिटर इतकी आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल ९७.१७ आणि डिझेल ८८.६० रुपये प्रतिलिटर आहे. सर्वात जास्त पेट्रोलचे दर मुंबईमध्ये आहेत.
दरम्यान,पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले जात असताना स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही वाढ केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ही नाराजी कमी करण्यासाठी सरकारने आता इंधनाचे दर कमी करण्यासाठी त्यावरील करात कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची बातमी आहे.





