Greece Election : कायरियाकोस मोत्सोताकीस पुन्हा ग्रीसचे पंतप्रधान

अथेन्स (ग्रीस) :- ग्रीसमधील उजव्या विचारसरणीचे आणि सुधारणावादी नेते कायरियाकोस मोत्सोताकीस यांची देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे.
मोत्सोताकीस यांच्या न्यू डेमोक्रसी पार्टीला 40 टक्के मते मिळाली आहे. तर विरोधी सिरीझा यांच्या पक्षाला केवळ 17 टक्के मते मिळाली आहेत. 300 सदस्य संख्या असलेल्या संसदेमध्ये मोत्सोताकीस यांच्या पक्षाला 158 जागा मिळाल्या आहेत.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील मोत्सोताकीस यांच्या पक्षाला विजय मिळाला होता. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले निर्विवाद बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे लगेचच नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महिन्याभरात झालेल्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये मोत्सोताकीस यांना पूर्ण बहुमत मिळाले आहे.
55 वर्षीय मोत्सोताकिस यांना ग्रीसच्या अध्यक्षा कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ दिली आणि औपचारिकपणे राज्यकारभाराची जबाबदारी सोपवली.





