“मोदींचा खरा चेहरा तो हाच..” अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भुंकप घडला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला आहे. या राजकीय नाट्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील आता उपमुख्यमंत्री बनले आहे. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.
सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”हे होणारच होतं ! आता निवडणुका झाल्या तर कर्नाटकसारखे बहुमत मविआला मिळेल हे स्पष्ट होते. पक्ष फोडण्याशिवाय भाजपाकडे पर्यायच नव्हता. अमेरिकेत १४ वेळा लोकशाही म्हणणाऱ्या मोदींचा खरा चेहरा तो हाच ! नुकतेच भ्रष्टाचारी म्हटले आता त्यांच्या बाजूला बसतील.पण काहीही करा यंदा भाजपा आपटणारच !”
हे होणारच होतं! आता निवडणुका झाल्या तर कर्नाटकसारखे बहुमत मविआला मिळेल हे स्पष्ट होते. पक्ष फोडण्याशिवाय भाजपाकडे पर्यायच नव्हता. अमेरिकेत १४ वेळा लोकशाही म्हणणाऱ्या मोदींचा खरा चेहरा तो हाच! नुकतेच भ्रष्टाचारी म्हटले आता त्यांच्या बाजूला बसतील.
पण काहीही करा यंदा भाजपा आपटणारच!— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 2, 2023
संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. “भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे,” असे संजय राऊत यांनी ट्वीट करत लिहिले आहे.
भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते.
त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.. https://t.co/L42b0t0Nyh— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023





