Sangli News : सांगलीत काँग्रेसची घरघर! विशाल पाटील, विश्वजित कदम यांच्यात गुपित बैठक, जयश्री पाटलांची कमतरता कशी भरून काढणार?

Vishal Patil | Vishwajit Kadam | सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपल्या हाती कमळ घेतले. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये मोठा खड्डा पडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपात पक्षप्रवेश केला. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी जयश्री पाटील यांची बंडखोरी रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, यश त्यांना यश आले नाही. यानंतर सांगलीत काँग्रेसला घरघर लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
श्रीमती पाटील यांच्या पक्षांतराने काँग्रेस पक्षात पडलेला खड्डा कसा भरून काढायचा यावर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. भारती मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनी बराच वेळ या विषयावर चर्चा केली. जुन्यांना रोखायचे आणि नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यायचा, असे धोरण त्यांनी गुपित बैठक ठरवल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, त्यांनी आखलेल्या धोरणाला यश येणार का? हे पाहण्यासाठी काही वेळ जावा लागणार आहे. भाजप आक्रमक चाली खेळत असताना त्याला तोंड कसे द्यायचे? ताकदीने उमेदवार आपल्याकडे राहतील, यासाठी काय धोरण राबवता येईल, याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांच्या वाट्याला पराभव आला.
हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सावध पावलं उचलली जात आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसे पक्षांची ताकद कमी झाली असल्याने आगामी काळात एकमेकांना समवेत घेण्याचे धोरण आखले जावू शकते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली जाऊ शकते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्ष कशी राजकीय रणनीती आखणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : “त्या गरीब कर्मचाऱ्याचा दोष काय?”; संजय गायकवाडांच्या राड्यानंतर राऊतांचा सवाल





