संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसची सद्भावना पदयात्रा; हर्षवर्धन सपकाळ मस्साजोगमध्ये दाखल

Harshvardhan Sapkal | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींचे राक्षसी कृत्य पाहून राज्यामध्ये एकच उद्रेक झाला होता. या प्रकरणानंतर तब्बल 84 दिवसांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. मात्र या प्रकरणाचा लढा संपला नसून मोठ्या संख्येने संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक पुढे आले आहेत. यातच आता काँग्रेसने मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बीडमध्ये पोहोचले आहेत.
मस्साजोग ते बीड 51 किलोमीटरची पदयात्रा
मस्साजोग ते बीड ही 51 किलोमीटरची पदयात्रेत राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी सामील झाले आहेत. यात्रेच्या माध्यमातून सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यादरम्यान एक मुक्काम नेकनूर येथे करून यात्रा बीडमध्ये दाखल होणार आहे. सद्भावना सभेच्या माध्यमातून रॅलीचा बीडमध्ये समारोप होईल. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. Harshvardhan Sapkal |
मारेकर्यांच्या चेहर्यावर हास्य येते तरी कुठून?
“संतोष देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये, देशमुखांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेला आहे आणि याबाबत समाजाने चिंतन करण्याची गरज आहे. मारेकर्यांच्या चेहर्यावर हास्य येते तरी कुठून? ही लढाई देशमुख कुटुंबियांची नाही तर या लढायला सर्वांना लढावी लागणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,” अशी मागणी देखील यावेळी सपकाळ यांनी केली.
“देशमुख कुटुंबियांनी सुद्धा इतका मोठा आघात झाल्यानंतरही सद्भावना जपली. धनंजय देशमुख असतील किंवा त्यांची मुलगी असेल त्यांनी कुठेही त्यांची तोल ढळू दिला नाही. त्यांनी आजवर कोणत्याही जाती, धर्माचे नाव घेतलेलं नाही,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. Harshvardhan Sapkal |
हेही वाचा:





