Congress MP R Sudha । दिल्लीत आज सकाळी एका महिला खासदाराच्याबाबतीत धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या एका महिला खासदार सकाळी मॉर्निंग वॉक करताना चोरटयांनी त्यांच्या सोनसाखळीवर डल्ला मारल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूच्या खासदार आर. सुधा तामिळनाडू भवनाजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या, त्यावेळी काही गुन्हेगारांनी त्यांची सोन्याची साखळी हिसकावून त्याठिकावरून पळ काढला. महिला खासदाराने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात त्यांना अनेक दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर दिल्लीतील लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सध्या दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्ष आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनीही रेखा गुप्ता सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या खासदाराने स्वतः गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. आर. सुधा यांचे अमित शहांना पत्र Congress MP R Sudha । तामिळनाडूच्या मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघातील खासदार आर. सुधा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले. या पत्रात “आज सकाळी चाणक्यपुरी परिसरातील पोलिश दूतावासाजवळ त्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेण्यात आली. या घटनेत त्यांना अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे.” असे सांगण्यात आले आहे. महिला खासदाराने गृहमंत्री अमित शहा यांना अधिकाऱ्यांना गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आणि अटक करण्यासाठी सूचना देण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत अशा घटना सामान्य Congress MP R Sudha । सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेवर भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, “दिल्लीत हे काही नवीन नाही. दिल्लीत चेन, मोबाईल हिसकावण्याचे प्रकार इतके सामान्य झाले आहेत की लोक आता एफआयआर देखील नोंदवत नाहीत. त्यांना माहित आहे की त्यांचा वेळ वाया जाईल.” सौरभ भारद्वाज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले की, सकाळी ६.०० वाजता दिल्लीत एका महिला खासदारासोबत चेन हिसकावण्याची घटना घडली आहे. असे सांगितले जात आहे की दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी त्यांची सोन्याची चेन हिसकावली आणि पळून गेले. सौरभ भारद्वाज म्हणाले की, दिल्लीतील लोकांना माहित आहे की जर ते पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यासाठी गेले तर काहीही होणार नाही. ते फक्त वेळेचा अपव्यय असेल. आप नेते पुढे म्हणाले की यासाठी पूर्णपणे पोलिस जबाबदार नाहीत. दिल्ली पोलिसात हजारो पदे रिक्त आहेत आणि सरकार भरती करू इच्छित नाही. जे आहेत ते व्हीआयपी सुरक्षेत आणि आम आदमी पक्षाच्या लोकांना अडकवण्यात व्यस्त आहेत. पोलिसांचे राजकारण केले गेले आहे. त्यांचे मूल्यांकन त्यांच्या कामावरून नाही तर त्यांच्या राजकीय कामावरून केले जाते. त्या आधारावर पोस्टिंग दिल्या जातात. ‘तामिळनाडूच्या खासदारांना दिल्लीच्या व्यवस्थेची काहीच कल्पना नाही’ सौरभ भारद्वाज पुढे लिहिले की दिल्लीच्या महिला आता साखळ्या घालून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत नाहीत. त्या खूप काळजी घेतात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला शांततेत जगायचे असेल तर साखळी घरी ठेवा. त्यातामिळनाडूच्या आहेत, म्हणून तिला पोलिस व्यवस्थेबद्दल काहीच माहिती नसेल.” असेही म्हटले आहे.