Imran Masood on Waqf Act | वक्फ कायद्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता काँग्रेसचे नेते आणि खासदार इम्रान मसूद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हैदराबादमध्ये ‘ऑल इंडिया मुस्लिम मिली काउन्सिल’च्या कार्यक्रमात बोलताना मसूद यांनी “आमचा पक्ष सत्तेत आला, तर वक्फ कायद्यात एक तासात बदल करू असं वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात बोलताना मसूद म्हणाले की, “मस्जिद नसेल, तर नमाज कुठे पढणार? स्मशानभूमी नसेल, तर दफन कुठे करणार? यासाठी एकच पर्याय आहे आम्ही सत्तेत यायला हवंच. ज्या दिवशी आम्ही येऊ, त्या दिवशी एका तासात वक्फ कायद्यावर उपचार करू. एका तासात कसे बदल करायचे हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. ज्या दिवशी येऊ, तेव्हा एका तासाच्या आत त्यात बदल करेल.’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. इम्रान मसूद यांनी आपल्या भाषणात जनतेला उद्देशून म्हटलं, “समुद्रात वादळ आहे आणि मोठं जहाजच वादळ झेलू शकतं. लहान बोटीतून काही उपयोग नाही. म्हणून मोठ्या जहाजात चढा. काँग्रेसला निवडा. मी वचन देतो आम्ही सत्तेवर आलो, तर एका तासात वक्फ कायद्याचा इलाज करू., असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मुर्शिदाबाद हिंसाचारावर प्रतिक्रिया बंगालच्या मुर्शिदाबाद भागात उसळलेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना मसूद म्हणाले, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आहोत. ही लढाई केवळ मुस्लिमांची नाही, ही संविधानाची लढाई आहे. वक्फ कायद्याद्वारे भाजपने संविधानाच्या मूल्यांना पायदळी तुडवलं आहे. विरोध हा कायदेशीर मार्गानेच करा. कायदा मोडणं हे भाजपचं काम आहे. आपले नाही. असेही ते म्हणाले.