काँग्रेस आमदार झुबेर खान यांचं निधन; अशोक गहलोत यांनी व्यक्त केले दु:ख

MLA Zubair Khan Passes Away | काँग्रेस आमदार झुबेर खान यांचे शनिवारी 14 सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये निधन झाले आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगडचे झुबेर खान हे आमदार होते. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. डॉक्टरांनी १५ दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. तर दीड वर्षांपूर्वी त्यांचे लिव्हर ट्रान्सप्लान्ट झाले होते.
अखेर त्यांनी आज पहाटे ५.५० वाजता अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. झुबेर खान यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी श्रद्धांजली दिली आहे. MLA Zubair Khan Passes Away |
वरिष्ठ कांग्रेस नेता एवं विधायक श्री जुबेर खान का इंतकाल हम सभी के लिए गहरा दुख देने वाला है। श्री जुबेर खान अपने क्षेत्र के विकास के लिए पूरी तरह प्रतिबद्ध थे एवं आखिरी समय तक जनसेवा में लगे रहे। उनका जाना एक अपूरणीय क्षति है।
मैं ईश्वर से दिवंगत आत्मा को शांति एवं परिजनों को… pic.twitter.com/E1FqOECqdC
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) September 14, 2024
कोण होते झुबेर खान ?
झुबेर खान यांचा जन्म 1 ऑगस्ट 1962 रोजी झाला. ते चार वेळा आमदार राहिले आहेत. 2018 मध्ये झुबेर खान यांची मेवात विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे त्यांनी पत्नी साफिया हिला निवडणूक लढवायला लावली, ज्यामध्ये साफिया 11 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. MLA Zubair Khan Passes Away |
मात्र, 2023 मध्ये झुबेर यांनी स्वतः काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते, जुबेर यांचा राजस्थान काँग्रेसमध्ये मोठा दबदबा होता. 2023 पूर्वी ते 1990, 1993 आणि 2003 मध्येही आमदार म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहत होते.
1998, 2008 आणि 2013 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. झुबेर हे अलवर जिल्ह्यात काँग्रेसचा मजबूत आधारस्तंभ होते. जुबेर खान हे जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही राहिले आहेत. MLA Zubair Khan Passes Away |
2023 मध्ये रामगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळाली आघाडी
2023 मध्ये अलवरच्या रामगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे झुबेर विजयी झाले होते. या जागेवर एसपीकेआरचे सुखवंत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर भाजपचे जय आहुजा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जय आहुजा यांचा 19,696 मतांनी पराभव करून त्यांनी विजय मिळवला होता. तर बसपा चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे येथे काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली. याद्वारे जुबेर यांना चौथ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली.
हेही वाचा :





