Congress Leader : काँग्रेसचा अनुभवी चेहरा हरपला; राहुल गांधींनी केले दु:ख व्यक्त
Congress Leader : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सरचिटणीस दीपक बाबरिया (वय ७५) यांचे शनिवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.

Congress Leader : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांचे शनिवारी (१० ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात शोककळा पसरली असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Congress Leader)
हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाची महत्त्वाची जबाबदारी
दीपक बाबरिया यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे संघटनात्मक काम केले. त्यांनी पक्षाचे माजी सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून काम करताना संघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले. (Congress Leader)
मध्य प्रदेशमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, त्या काळात बाबरिया हे राज्याचे प्रभारी होते. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजातील त्यांचा अनुभव आणि योगदान यामुळे त्यांना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाचे स्थान होते. (Congress Leader)
प्रकृतीच्या कारणामुळे हरियाणाच्या प्रभारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी
ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बाबरिया यांनी प्रभारी पद सोडण्याची तयारी दर्शवली होती. प्रकृती ठीक नसल्याचे सांगतानाच निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. (Congress Leader)
आपल्या जागी अन्य व्यक्तीकडे जबाबदारी सोपवावी, अशी विनंती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला केली होती. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी पक्षश्रेष्ठींवर सोपवला होता. (Congress Leader)
राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांकडून श्रद्धांजली
दीपक बाबरिया यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले. बाबरिया यांचे निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न निघणारे नुकसान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संघटनेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे राहुल गांधी यांनी म्हटले. (Congress Leader)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही बाबरिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पक्षाच्या विचारधारेप्रती त्यांची बांधिलकी आणि कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य यांचे स्मरण करत खरगे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Congress Leader)
ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही समाजमाध्यमांवर शोकसंदेश व्यक्त करत बाबरिया यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याची भावना पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली. (Congress Leader)
Congress Leader Death : राजकीय वर्तुळात शोककळा ! काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा मृत्यू





