Maharashtra Politics : राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर? राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला (Congress) मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics : गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांच्यासह तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून, पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या संभाव्य घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
मात्र, संदीप भाटिया आणि संबंधित तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असली तरी, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पक्षप्रवेश झालेला नाही. (Maharashtra Politics)
या चर्चेमुळे गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, संबंधित नेते अखेर कोणता निर्णय घेतात आणि अधिकृत भूमिका काय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का; नवाब मलिक यांच्या पुतणीचे नगरसेवकपद रद्द
Maharashtra Politics : राज्यातील सर्वात मोठी घडामोड; भाजप-शरद पवार गट एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ





