Nana Patole : सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली; ७५ नव्हे ९९ टक्के भागात दुष्काळ : नाना पटोले
Nana Patole : राज्यात अत्यंत गंभीर आणि भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना महायुती सरकारकडून अत्यंत उशिरा दुष्काळ जाहीर केला जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole : राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राज्य सरकारकडून उशिरा दुष्काळ जाहीर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. कर्नाटक सरकारने एक महिना आधीच दुष्काळ जाहीर करुन मदत सुरू केली. (Nana Patole)
मात्र, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार यावर उशिरा निर्णय घेत आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. तसेच, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका पटोलेंनी केली. (Nana Patole)
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केवळ 75 टक्के नव्हे तर 99 टक्के भागात दुष्काळाची परिस्थिती असून तातडीने पंचनामे करून सरसकट कर्जमाफी व भरभक्कम मदत जाहीर करावी, अशी मागणी पटोलेंनी केली. (Nana Patole)
तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पटोले यांनी गंभीर आक्षेप घेतला. पश्चिम बंगाल भाजपच्या प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कार देण्याची केलेली मागणी म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या दोन सहकारी सदस्यांवर आमचा स्पष्ट आक्षेप आहे. (Nana Patole)
या सदस्यांनी 10 दिवसांत अनेकदा केंद्रीय सचिवांना व मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्रे लिहून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकीतील गैरव्यवहारांबाबत आणि लोकशाहीचा खून होत असल्याबद्दल लक्ष वेधले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पटोलेंनी केला. (Nana Patole)
देशात लोकशाहीचा मोठा उद्रेक सुरू असून, मतदारांच्या अधिकारावरच घाला घालण्याचे काम या पद्धतीने सुरू आहे. पूर्वी सरकार लोकांना घाबरायचे, पण आता उलटी परिस्थिती निर्माण झाली असून, लोकच सरकारला घाबरत आहेत, असे पटोले म्हणाले. (Nana Patole)






