Pune News : पुणे विद्यापीठातील मेसची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) रिफेक्टरी आणि वसतिगृहातील मेससाठी प्रस्तावित केलेली १० रुपयांची भोजन दरवाढ अखेर प्रशासनाने मागे घेतली आहे.

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरी आणि वसतिगृहाच्या मेसमध्ये प्रस्तावित केलेली १० रुपयांची भोजन दरवाढ अखेर मागे घेण्यात आली आहे. शनिवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. (Pune News)
विद्यापीठ प्रशासनाने मेसच्या शुल्कात १० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात असलेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि विद्यार्थ्यांवरील वाढता आर्थिक ताण विचारात घेता ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली होती. (Pune News)
यासाठी संघटनांच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा वाढता विरोध आणि आंदोलनाची दखल घेत व्यवस्थापन परिषदेने दरवाढीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. (Pune News)
केवळ दरवाढ मागे घेऊन न थांबता, मेसमधील जेवणाचा दर्जा सुधारण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला. भोजनाची गुणवत्ता तपासण्यासाठी डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. संगीता जगताप यांच्या सहभागाने एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. (Pune News)
Pune News : वैभवशाली मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप





