#Congress । कर्नाटकात भाजपच्या विरोधात कॉंग्रेसने आखली आता ‘ही’ मोहीम

बेंगळुरू – कर्नाटकात प्रदेश कॉंग्रेसने ( Congress ) आज भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजप सरकारवर निशाणा साधत से सीएम डॉट कॉम ही मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सरकारने जनतेला सुमारे 600 आश्वासने दिली होती. त्यातील 90 टक्के आश्वासने अपूर्ण राहिली आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंचं, दिल्ली उच्च न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळली
यासाठी कॉंग्रेसने ( Congress ) एक नावीन्यपूर्ण वेबसाइट तयार केली असून त्यात कॉंग्रेसचे अधिकृत प्रचार गीत देखील आहे. भाजपकडून अपूर्ण राहिलेली आश्वासने आणि त्यांना कॉंग्रेसने विचारलेल्या प्रश्नांची यादीही यात टाकण्यात आली आहे. आतापर्यंत आम्ही सरकारला 50 प्रश्न विचारले पण त्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर न देणाऱ्या भाजपने मौन बाळगून अपराधीपणा स्वीकारला आहे, असेही यात म्हटले आहे.
कर्नाटकातील भाजप सरकार हे 40 टक्के कमिशन सरकार असल्याची जोरदार टीका कॉंग्रेसकडून ( Congress ) करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पे सीएम अशी पोस्टर बाजी काहींनी करून बोम्माई सरकारवर जोरदार टीका केली होती. पण ही पोस्टर्स लावणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता पे सीएमऐवजी से सीएम अशी संज्ञा वापरून कॉंग्रेसने हा हल्लाबोल केला आहे.





