Congress Leader : मोठी बातमी..! काँग्रेसचा धडाडीचा नेता हरपला; राजकीय वर्तुळात शोककळा
Congress Leader : काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्याचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Congress Leader : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शाहाबाद येथील रहिवासी अजहर यार खान यांचे बुधवारी लखनऊ येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय वर्तुळात शोककळा पसरली.(Congress Leader)
बुधवारी सायंकाळी शाहाबाद येथील त्यांच्या पैतृक कब्रस्तानात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. (Congress Leader)
अजहर यार खान यांनी पोलीस सेवेत अनेक वर्षे कार्य केल्यानंतर निवृत्तीनंतर काँग्रेसमध्ये सक्रिय प्रवेश केला. ते काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठावान राहून त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने काम केले. (Congress Leader)
त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि तळागाळातील कार्यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक अनुभवी, समर्पित आणि प्रामाणिक नेता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. (Congress Leader)
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असून, त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभांचे आयोजन करण्यात येत आहे. (Congress Leader)
Punjab Congress : पंजाब कॉंग्रेसमध्ये कुठलेही बंड नाही; प्रदेशाध्यक्ष वारिंग यांची ग्वाही






