नागपूरात काॅंग्रेसच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; जाहीर भाषणात काय म्हणाले राहुल गांधी ? वाचा..

Congress Foundation Day 2023 : आज काँग्रेसचा (28 डिसेंबर) 139 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने काँग्रेसच्या वतीन नागपुरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हैं तैयार हम’ असा नारा देण्यात आला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह देशभरातील काॅंग्रेसचे बडे नेते या सभेसाठी उपस्थित राहिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस नागपुरात होणाऱ्या ‘हैं तैयार हम’ या मेगा रॅलीने करत आहे. यावेळी मैदानावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत होती. आरएसएसच्या बालेकिल्ल्यात होत असलेल्या या काॅंग्रेसच्या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. महारॅलीत लाखोंच्या संख्येने लोक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
राहुल गांधी यांच्या भाषणातील काही मुद्दे –
– स्वातंत्र्यपूर्व काळातही काॅंग्रेस गरिबांसाठी लढत होता.
– हा देश राजेशाहीनं चालवला जावू शकत नाही
– जे इंग्रजांच्या काळात होतं तीच परिस्थिती आज भाजपमध्ये
– लोकशाहीचा अभाव हे इंग्रज आणि भाजपमधील साम्य
– कार्यकर्त्यांच्या मताचा मी नेहमी मान ठेवतो
– भाजप देशाला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातंय
– देशातील संस्था भाजपमुळे संपत चालल्या आहेत
– अस्पृश्यता ही रा. स्व. संघाची विचारसरणी
-स्वातंत्र्याचा लढा जनसामान्य लढले राजे-महाराजे नाही
– मतदानाचा अधिकार काॅंग्रेसमुळे मिळाला
– कुणाचं ऐकुनच घ्यायचं नाही हा मोदींचा स्वभाव
– भाजपमध्ये आदेश न पाळण्याची सोय नाही
-भाजपचा एक खासदार मला लपत छपत भेटला, मला म्हणाला भाजपमध्ये आता सहन होत नाही
यासह अनेक मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले, सविस्तर व्हिडीओ पहा-
नागपूरात लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार –
नागपुरातील महारॅलीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे सरचिटणीस आणि सर्व प्रदेश प्रभारींचीही बैठक घेणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.





