Gujarat Assembly Poll Results : गुजरात पराभवाच्या मूल्यांकनासाठी कॉंग्रेसची समिती

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सुधारात्मक (Congress forms committee to evaluate Gujarat Assembly poll results) उपाय सुचवण्यासाठी कॉंग्रेसने बुधवारी तीन सदस्यीय तथ्य शोध समितीची स्थापना केली.
या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत असतील, जे पक्षाच्या एससी विभागाचे प्रमुख देखील आहेत. समितीचे इतर सदस्य शकील अहमद खान आणि सप्तगिरी शंकर उलाका हे आहेत, असे पक्षाच्या अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समिती कॉंग्रेस अध्यक्षांना दोन आठवड्यांत अहवाल सादर करेल. गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.
Bank scams : सुब्रमण्यम स्वामींच्या ‘त्या’ याचिकेला आरबीआयचा विरोध
तेथील एकूण 182 मतदारसंघांपैकी केवळ 17 जागा कॉंग्रेसने जिंकल्या. पक्षाला या निवडणुकीत एकूण 27.28 टक्के मते मिळाली. गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाची ही सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे.





