Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून या नावांची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिद्धिकी, परांजपे, ठाकूर,…कोणकोण इच्छुक? वाचा संपूर्ण यादी
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आता विविध पक्षातील इच्छुक नेत्यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Vidhan Parishad Election 2026 : मे महिन्यात विधानपरिषदेतील 9 जागा रिक्त होणार असल्याने या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. अशा एकूण मिळून 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल असल्याची माहिती आहे. मात्र अशीही चर्चा आहे की उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार नाहीत. त्यांच्याऐवजी पक्षातील इतर नेत्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाऊ शकते. या संबंधित नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता काँग्रेसकडूनही अनेक जण विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून या नावांची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिद्धिकी, परांजपे, ठाकूर,…कोणकोण इच्छुक?
या इच्छुकांची नावे समोर आली आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनमंत पवार, राजेश राठोड यांची नावं विधानपरिषदेसाठी चर्चेत आली आहेत . त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जागा एक आणि इच्छूक अनेक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. (Vidhan Parishad Election 2026)
दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 9 पैकी 2 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, पक्षातील विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांची नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये झिशान सिद्धिकी, उमेश पाटील, संजय दौंड, सुरेखा ठाकरे,आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, राजेंद्र जैन ही नाव चर्चेत आहेत.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) हे आकडे पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. Vidhan Parishad Election 2026







