Amravati Ayan Tanveer Case : परतवाडा प्रकरणात अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा; म्हणाले “राणा हिंदू धर्मियांना बरबाद करताय, त्यांच्यावर…”
Amravati Ayan Tanveer Case : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका प्रकरणावरुन राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षांनी खळबळजक दावा करत माजी खासदार नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे.

Amravati Ayan Tanveer Case : नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात प्रकरणानंतर एकामागून एक धक्कादायक लैंगिक शोषणाचे आणि धर्मांतराची प्रकरणे समोर असून यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता अमरावती येथील लैंगिक शोषण प्रकरणाने वेगळं वळण घेतले आहे.
या प्रकरणी माजी खासदार नवनीत राणा यांनी हिंदू मुलींचे शोषण झाल्याचा दावा केला होता, मात्र आता राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पत्रकार परिषद घेत नवनीत राणांचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
“नवनीत राणांनी चुकीची माहिती पसरवू नये, अफवा पसरवून दंगल भडकवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे,” असा आरोप राणांवर प्यारे खान यांनी केला आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी मुस्लिम असल्याचे खान यांनी सांगितले. परतवाडा इथे एका प्रकरणावरून नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेत हिंदू मुलींच्या शोषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. (Amravati Ayan Tanveer Case)
प्यारे खान यांचा दावा
या प्रकरणातील विविध मुद्यांवर प्यारे खान यांनी पत्रकार परिषदेत दावा करत 8 पीडित मुली या मुस्लिम असल्याची माहिती मिळाली आहे. यात एकाही हिंदू मुलीचा समावेश नाही, तरीही त्याला धार्मिक रंग दिला जात आहे. इतकंच नाही तर हे संपूर्ण प्रकरण कोणत्याही लव्ह जिहाद किंवा धार्मिक कटातून नाही, तर दोन मित्रांमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणातून समोर आले असल्याचे खान यांनी सांगितले. (Amravati Ayan Tanveer Case)
तसेच पत्रकार परिषदेत प्यारे खान यांनी नवनीत राणांवर आरोपांची तोफ डागली. नवनीत राणा या शहरात दंगे भडकवण्याचं काम करत आहेत. तुम्ही हिंदूंना बरबाद करण्याचं काम केलं. पंतप्रधान मोदी, मोहन भागवत देशाला जोडण्यासाठी प्रयत्न करता आहेत आणि तुम्ही देशाला तोडण्याचं काम करत आहात. तुम्हीच पाकिस्तानला निघून जा. या देशात मुस्लीम सुरक्षित आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी अशा बदनामी करणान्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परतवाडा प्रकरणात धर्माचा कोणताही अँगल नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. (Amravati Ayan Tanveer Case)





