Pune Congress – पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी दोन जिल्ह्याध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहेत. शिरुर, बारामती यांप्रमाणे दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात येणार येणार असून, येत्या १० दिवसांत नव्या जिल्ह्याध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्यात संघटन सृजन अभियान प्रकिया सुरू करण्यात आले. त्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीसाठीचे निरिक्षक योगेश एच. सी., प्रफुल्ल गुडदे पाटील, रामहारी रूपनवर, प्रशांत जगताप, अनंत मोहोद, विश्वजित हाप्पे यांच्यासह देविदास भन्साळी, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या उपस्थितीतीत बुधवारी (दि. १५ ) काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद झाली. यात योगेश एच. सी. यांनी ही माहिती दिली. शिरूरसाठी एक व बारामतीसाठी एक याप्रमाणे पुणे जिल्ह्यासाठी दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत. शिरुरसाठी १०, तर बारामतीसाठी ५ जण इच्छुक आहेत. शिरूरअंतर्गत शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ आणि बारामतीअंतर्गत बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, खडकवासला या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. निरीक्षकांनी जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा चार दिवस दौरा करून प्रत्येक तालुक्यांतील ठिकाणच्या प्रमुख्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून ऑनलाइन अर्जही मागविल्याचे, असे योगेश एच. सी. यांनी सांगितले.