BJP Vs Congress: प्रियंका गांधींच्या नामांकनावेळी खरंच मल्लिकार्जुन खर्गे बाहेर थांबले होते का? काँग्रेसने दिले स्पष्टीकरण

BJP Vs Congress: वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांच्या नामांकनावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बाहेर थांबल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने जोरदार हल्ला केल्याप्रकरणी काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी गुरुवारी भाजपचे दावे फेटाळून लावले आणि सांगितले की त्यांचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले की, दरवाजे बंद असल्याने राहुल आणि सोनिया गांधी काही वेळ बाहेर थांबले, तर खरगे संपूर्ण वेळ उपस्थित होते. त्यांनी भाजपवर खोटेपणा पसरवत खर्गे यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.
भाजपने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ –
आज जिस तरह से मल्लिकार्जुन खड़गे जी को प्रियंका वाड्रा के नामांकन के समय कमरे से बाहर रखा गया…
ठीक उसी तरह राहुल गांधी आरक्षण हटाने के बाद दलित समाज के लोगों को सम्मान और अवसरों से वंचित रखेंगे।
अगर गांधी परिवार खड़गे जी को ऐसे अपमानित कर सकता है तो दलित समाज के प्रति इनके मन… pic.twitter.com/75LFlDo8qJ
— BJP (@BJP4India) October 23, 2024
बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसवर साधला निशाणा –
यापूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी भाष्य केले होते की, त्यांनी अशा घटना सार्वजनिक ठिकाणी अनेकदा पाहिल्या आहेत. बसवराज बोम्मई यांनी मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातील महान नेते असल्याची प्रशंसा केली आणि राजकीय मतभेद असूनही भाजपने त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही त्यांचा आदर करतो. ते काँग्रेसमध्ये असले तरी ते आमचे नेते आहेत.
भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांवर केला हल्लाबोल –
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सीआर केसवन यांनीही काँग्रेसने खर्गे यांच्याशी केलेली कथित वागणूक भयावह असून ते वरिष्ठ दलित नेत्याबद्दल तिरस्कार दर्शविते असे म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्पृश्यतेच्या प्रथा असल्याचा आरोप करताना म्हटले की, (काँग्रेसमध्ये) दलितांचा अपमान केला जातो. दलितांना पक्षात तृतीय श्रेणी नागरिकांप्रमाणे वागवले जाते.





