उत्तरप्रदेशसाठी कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर
Updated On:

लखनौ – कॉंग्रेसने उत्तरप्रदेशसाठी आपल्या 61 उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. त्यात त्यांनी 24 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
या यादीत त्यांनी दोन बदल केले आहेत. हाथरस या महत्वाच्या मतदार संघात कॉंग्रेसने सरोजा देवी यांच्या ऐवजी कुलदीपकुमार सिंह यांना उमेदवारी दिली असून बिजनवास मतदार संघात अभिनव भार्गव यांच्या ऐवजी वंदना भार्गव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेसने आपल्या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 50 महिलांना उमेदवारी दिली असून 41 जणांच्या दुसऱ्या यादीत 16 महिलांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या यादीतील 89 उमेदवारांपैकी 37 महिला उमेदवार आहेत.
उत्तरप्रदेशातील चाळीस टक्के जागा महिलांना दिल्या जातील अशी घोषणा पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी या आधीच केली आहे. त्यानुसार उमेदवार जाहींर केले जात आहेत.





