लाखणगाव, (वार्ताहर) – पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील लक्ष्मण मखर यांची कन्या वैष्णवी मखर हिने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळवले आहे. त्याबद्दल पोंदेवाडी ग्रामस्थांनी आळे येथे सत्कार केला. आळे (ता.जुन्नर) येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. आई व वडील शिक्षक म्हणून काम करत असल्याने प्रथमपासूनच तिला अभ्यासाची आवड होती. तिने केलेल्या प्रयत्नाला यश आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी पोंदेवाडी ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर.माजी उपसरपंच संदीप पोखरकर, माजी सरपंच बबनराव वाळुंज, अमोल वाळुंज, रामदास मखर, लक्ष्मण मखर, विठ्ठल मखर उपस्थित होते.