पुणे जिल्हा : फडणवीसांचे शेवाळेंकडून अभिनंदन
Updated On:

रांजणगाव गणपती : राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन अभिनंदन केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनता दलासह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या प्रमुखांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या महाविजयाबद्दल महायुतीतील घटक पक्षांचे आभार मानले.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सरकार स्थापन झाल्यावर सरकारमध्ये सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी यांना सन्मानाची वागणूक भेटेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना दिले.





