हिमेश रेशमियाला पितृशोक; संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे 87 व्या वर्षी निधन

Himesh Reshammiya Father Death | बॉलीवूड गायक हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या सुरू असल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सखेर विपिन रेशमिया यांची 18 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ प्राणज्योत मालवली.
हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया वृद्धापकाळातील समस्या आणि आजारांशी झुंजत देत होते. हिमेशचे वडील विपिन यांच्या पार्थिवावर गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील जुहू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती फॅशन डिझायनर वनिता थापर यांनी दिली आहे. हिमेशने आपल्या वडिलांना आपले गुरू मानले होते. मात्र आता वडिलांचे छत्र हरपल्याने हिमेशवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, विपिन रेशमिया यांनी ‘द एक्सपोज’ आणि ‘तेरा सुरूर’ची निर्मिती केली होती. विपिन यांनी ‘इन्साफ का सूरज’ नावाच्या रिलीज न झालेल्या चित्रपटासाठी संगीत दिले. विपिन रेशमिया आणि सलमान खानच्या चित्रपटालाही म्युजिक दिले होते. यानंतर सलमानने हिमेश रेशमियाला एक संधी दिली.
हिमेशने 1998 मध्ये रिलीज झालेल्या सलमान आणि काजोलची भूमिका असलेल्या ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत दिले होते. त्यानंतर हिमेशने सलमानच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. हिमेशची अनेक गाणी लोकप्रिय ठरली. त्याने इंडियन आयडॉल या शोमध्ये देखील जजच्या भूमिकेत काम केले आहे.
हेही वाचा:





