आरोग्य व्यवस्थेबरोबरच वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी संदर्भातील सवलती जाहीर कराव्यात; भाजप नेते गणेश कुटे यांची मागणी
Updated On:

वाघोली – महाराष्ट्र राज्यात सद्या लॉक डाऊन चा कार्यकाळ सुरू झाला असून आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य दिले असले तरीही व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे सरकारने प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.
याशिवाय वीज बिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्यात. लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने देखील राज्य सरकारने निर्णय घेऊन या लॉक डाऊन च्या कालावधीत कार्य करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांनी केली आहे.





