Pune News : संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा महाराष्ट्र चेंबरतर्फे गौरव
Pune News : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) ने ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल 'मानपत्र' देऊन सन्मानित केले आहे.

Pune News : महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि ऐतिहासिक उद्योग संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA)ने ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक व एआय नवोन्मेषक डॉ. दीपक शिकारपूर यांना तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता, करिअर मार्गदर्शन आणि युवक सक्षमीकरणातील त्यांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मानपत्र (सायटेशन ऑनर) देऊन गौरविले. (Pune News)
१९२७ मध्ये थोर उद्योगद्रष्टे स्वर्गीय वालचंद हिराचंद यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र चेंबर इंडस्ट्रीस अँड ऍग्रीकल्चर च्या शताब्दीच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीत समाजावर आणि उद्योगविश्वावर व्यापक सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात येत आहे. (Pune News)
त्याच उपक्रमाचा भाग म्हणून डॉ. शिकारपूर यांचा हा सन्मान करण्यात आला. डॉ. शिकारपूर यांनी गेली चार दशके माहिती तंत्रज्ञान सर्वसामान्यांना, विशेषतः युवकांना, सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगण्याचे कार्य केले आहे. (Pune News)
त्यांच्या लेखन, व्याख्याने, ग्रामीण भागातील जनजागृती, डिजिटल साक्षरता उपक्रम आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांमधून त्यांनी डिजिटल युगातील संधी सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. त्यांनी ६९ पुस्तके लिहिली असून शेकडो व्याख्याने, पॉडकास्ट युवा सक्षमीकरणासाठी सादर केली आहेत. (Pune News)
डॉ. शिकारपूर यांनी विकसित केलेले बहुभाषिक डिजिटल ट्वीन एआय चॅट बोट (twin.deepakshikarpur.com) हे त्यांच्या या कार्याचे आधुनिक स्वरूप आहे. १०० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असलेले हे व्यासपीठ त्यांच्या अनेक दशकांच्या ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शनाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून युवकांसाठी उपलब्ध करून देते. (Pune News)
वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण, कौशल्ये आणि करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळविण्यासाठी हे एक अभिनव माध्यम ठरत आहे. चेंबरच्या पुणे बिझनेस फोरमचे प्रमुख महेंद्र देवी यांच्या हस्ते डॉ. शिकारपूर यांना हे सन्मानचिन्हपत्र प्रदान करण्यात आले. (Pune News)
यावेळी क्लस्टर हेड श्री. सी. पी. ठक्कर तसेच उद्योजक, व्यावसायिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि चेंबरचे सदस्य उपस्थित होते. हा सन्मान स्वीकारताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, हा सन्मान केवळ माझ्या कार्याची दखल नाही, तर तंत्रज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्याच्या माझ्या प्रयत्नांना मिळालेली नवी प्रेरणा आहे. विशेषतः युवकांना सक्षम करणे आणि डिजिटल व एआय युगातील संधी सर्वांपर्यंत पोहोचविणे, हे माझे कार्य यापुढेही सुरू राहील. (Pune News)
Pune News : मनातील नकारात्मकतेचा विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज





