Pune : आयटी क्षेत्रात स्पर्धा वाढली! नोकरी मिळण्यासाठी तरुणांची धडपड; भल्या मोठ्या रांगेचा VIDEO व्हायरल

पुणेः तरुणांच्या हाताला काम नाही. नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी मोठी स्पर्धा आहे. खाजगी नोकऱ्यांची संधी आहे पण आता तिथे देखील स्पर्धा खूप वाढली आहे. असे एक ना अनेक सध्या राज्यातील बेरोजगार तरुणांपुढे आवासून उभे आहेत. नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड होत आहे. त्यातही नोकरी मिळालीच तर कायमस्वरुपी टिकेल की नाही याची शक्यता सांगणे अवघड आहे.
तरुणांनी आयटी क्षेत्रात पाऊल ठेवत तिथे नोकरी करण्याचे ठरवले. आता तिथेही मोठी स्पर्धा निर्माण झाली असून कायमस्वरुपी नोकरीची श्वास्वती राहिलेली नाही. बेरोजगार तरुणांची वाढती बेरोजगाराची संख्या दर्शवणारे एक विदारक स्थिती एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभियंता पदाची नोकरी मिळवण्यासाठी तब्बल ३ हजार तरुणांची रांग लागल्याचे सांगण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
पुण्यात आयटी नोकरीसाठीची चुरस किती तीव्र आहे, याचा अंदाज लावणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, 3,000 पेक्षा अधिक अभियंते वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी रांगेत उभे आहेत. ही घटना आयटी नोकरीच्या संधीसाठीची तीव्र स्पर्धा आणि सध्याच्या… pic.twitter.com/tJ22qCMphB
— Rahul Kulkarni (@RahulAsks) January 26, 2025
हा व्हायरल झालेल्या व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा भागातील असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील एका आयटी कंपनीच्या गेटबाहेर अभियंत्याच्या जागेसाठी तरुणांची भलीमोठी रांग लागल्याची सांगितले जात आहे. तीन हजारांहून अधिक तरुण या रांगेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही रांग पाहून बेरोजगाराची भिषणात लक्षात येते. आयटी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड यातून दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राज्यातील बेरोजगाराची परिस्थिती लक्षात घेत तरुणांना महिन्याला बेरोजगारी म्हणून काही भत्ता देणार असल्याचे आश्वासनाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.





