पुणे | विद्यार्थ्यांमधून सक्षम नेतृत्व उदयास येईल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमधून उद्याचे सक्षम नेतृत्व उदयास येईल व ते जबाबदार नागरिक बनतील. त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास होईल, असे प्रतिपादन पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॉड.पांडुरंग थोरवे यांनी केले.
विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळ कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून थोरवे बोलत होते. मुख्याध्यापक विष्णू मोरे, शिक्षक प्रतिनिधी गौरी गोळे, वैशाली सैंधाणे, प्रमोदिनी कबुले, मनोहर निकम, रेश्मा देवकाते, तेजस्विनी निरगुडे, पल्लवी अभंग, सुप्रिया बिरजे, रेश्मा पुरी, मंदा काशीद, दीपक आगवणे, चंद्रकांत कुडले, सुभाष कांबळे, अपूर्वा आदलिंगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊंच्या जीवनावर पोवाडा सादर केला. राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षण (अभ्यास), सांस्कृतिक कार्य, आरोग्य व स्वच्छता, शिस्त, प्रार्थना व परिपाठ, वाचनालय, क्रीडा, पर्यावरण, सहल, शालेय पोषण आहार अशा विविध खात्यांचे मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.





